कोरोनाचा कहर कायम; दिल्लीतील लॉकडाऊन पुन्हा वाढवला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-देशात कोरोनाची दुसरी लाट ही त्यांत घातक ठरू लागली आहे. यातच प्रत्येक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

यातच दिल्लीमध्ये देखील कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे दिल्लीमध्ये पुढील 1 आठवड्यापर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरमुळे 20 एप्रिलपासून सुरू असलेला लॉकडाऊन 10 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. आता 10 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू राहिल. 26 एप्रिलपासून सात दिवसांसाठी हा लॉकडाऊन वाढविण्यात आला होता.

पण आता लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे. दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिका-याने आधीच अशी भीती व्यक्त केली होती की, दिल्लीची परिस्थिती पाहता ते किमान 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जावू शकतो.

भविष्यात आवश्यक असल्यास तो 31 मे पर्यंतही वाढू शकतो. परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हाच एक पर्याय उपलब्ध आहे. रुग्णालयात बेड आणि कोरोनाची औषधे उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनची कमतरता आहे.

लोकं रूग्णालयात उपचार करण्यासाठी रात्रभर ठिकठिकाणी फिरत आहेत. प्रशासन असहाय्य दिसत आहे. येथे चिंतेचा मुद्दा असा आहे की दिल्लीत मृतांची संख्या सतत वाढत आहे. स्मशानभूमीत जाळण्यासाठी थांबावे लागत आहे.

नवीन स्मशानभूमी बांधली जात आहेत. दफनभूमीच्या बाबतीत ही हिच स्थिती आहे. कोरोनाचा संसर्ग दिल्लीत गंभीर रुप धारण करत आहे.

ऑक्सिजनचे संकट आणि औषधांचा तुटवडा यांच्या दरम्यान ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविला आहे. या सर्वांच्या दरम्यान दिल्ली सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|