ढिसाळ कारभारामुळे शेतकरी बांधव हवालदिल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  रब्बी हंगामात पिकांना पाण्याची फार आवश्यकता असतांना देखील जलसंपदा खात्याने उन्हाळी रोटेशनचे आवर्तनाचे तारखा वेळेवर जाहीर न केल्यामुळे कांदा व गहू यांना एका पाण्याची गरज असताना ते वेळेवर मिळाले नाही.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधी यांनी नियोजन करणे गरजेचे असताना देखील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्षामुळे तसेच जलसंपदा खात्याचे ढिसाळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला.

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी दिला.

धरणात पाणीसाठा मुबलक असताना देखील पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी यांनी आवर्तन बाबतचे योग्य नियोजन करणे गरजेचे असताना देखील पाणी न मिळाल्याने शेतकरी बांधव पाणी मिळण्याची मागणी करत आहे.

मागील वर्षी उन्हाळी आवर्तन व पाऊस एकाच वेळेस सुरु झाला होता. परंतु मागील वर्षी उन्हाळी पीके कमी असल्याने पाणी मागणी कमी होती. यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. पाणी मागणी वाढलेली आहेत.

धरणातही पाणीसाठा पुरेशा प्रमाणात असल्याने मार्चमध्येच उन्हाळी पहिले आवर्तन द्यायलाच पाहिजे होते. परंतु याबाबत कुठेही व कोणीही दखल न घेतल्याने सध्याचे आवर्तन सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांची पिकेही हाताबाहेर गेली व पिकांची मोठे नुकसान झाले.

कोरोनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यांनी शेतात उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही व त्यातच विक्री केल्यास त्यांचा खर्च देखील निघत नाही, अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली. वादळीवारा, गारपीट, अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले.

वेगवेगळे संकट शेतकरी बांधवांवर येत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेला, तरी पण शेतकरी आजही काबाडकष्ट करत आहे. शेतकरी बांधवांनी जगायचे तरी कसे? उशिरा म्हणजे १५ एप्रिल रोजी उन्हाळी रोटेशन सोडण्यात आले.

रोटेशन सोडून १५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पाणी पोहचले नाही, सर्वांना कॅनालच्या माध्यमातून दिसत असलेले पाणी मुरते तरी कुठे याचा शोध घेणे गरजेचे आहे, असेही कोल्हे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|