अशा पद्धतीने ओळखा रेमडेसिविरचे इंजेक्शन खरे आहे की बनावट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे.

यातच या इंजेक्शनची वाढती मागणी पाहता याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.

आपल्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन मिळावे यासाठी नातेवाईक चढ्या दराने याची खरेदी करत आहे.

यामुळे हे इंजेक्शन काळ्याबाजारात 20 हजार तर कुठे 40 हजार रुपयांना विकले जात आहे. मात्रा याचाच फायदा घेऊन आता बनावट रेमडेसिविरची विक्री होऊ लागली आहे.

यामुळे हे इंजेक्शन खरे आहे की खोटे हे कसे ओळखता येईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

खरे आणि बनावट जाणून घ्या ओळखण्याची पद्धत :- रेमडेसिविरच्या पाकिटावरील काही चुका जाणून घेऊन आपण खऱ्या किंवा बनावट रेमडेसिविरमधला फरक ओळखू शकतात.

100 मिलिग्रॅमचे इंजेक्शन हे फक्त पावडरच्या रुपातच शिशीत असते. ही सर्व इंजेक्शन ही 2021मध्ये तयार केलेली आहेत.

या सर्व इंजेक्शनच्या शिशीवर रेमडेसिविर असे लिहिलेले असते. इंजेक्शनच्या बॉक्सच्या मागे एक बारकोडही असतो.

लक्ष ठेवा या सामान्य तपशीलांवर आणि ओळखा फरक :- खऱ्या रेमडेसिविरच्या पाकिटांवर इंग्रजीत For use in असे लिहिलेले आहे तर बनावट पाकिटांवर for use in.. असे लिहिलेले आहे.

बनावट पाकिटावरील या सूचनेची सुरुवात कॅपिटल अक्षरापासून होत नाही. खऱ्या पाकिटाच्या मागे लाल रंगावर तर बनावट पाकिटावर काळ्या रंगाने सावधानतेची सूचना दिलेली आहे. खऱ्या रेमडेसिविरच्या इंजेक्शनची काचेची शिशी खूप हलकी असते.

हे फरक आपल्याला माहित असल्यास आपणही इंजेक्शन फसवणुकीपासून आपला बचाव करू शकता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|