Breaking News Updates Of Ahmednagar

व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यू वाढले

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-संगमनेरमध्ये शुक्रवारी ३४९ बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णसंख्या १५,१७५ झाली. १८०३ रुग्णांवर सध्या उपचार सुुरू आहेत.

१३,२८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ८३ जणांचा बळी कोरोनाने घेतला. व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडअभावी अनेकांनी प्राण सोडला.

Advertisement

अन्य तालुक्यांतील अनेक रुग्ण संगमनेरात उपचार घेत आहे. घुलेवाडीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात ६० ऑक्सिजन बेड असले,

तरी तेथे स्टाफ व डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्ण दगावत आहे. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने चिंताजनक परिस्थिती आहे.

Advertisement

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पोलिस यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. २०२० मध्ये वर्षभरात ८७३० बाधितांची नोंद झाली होती.

एप्रिलमध्ये सर्वाधिक ६४४५ बाधितांची नोंद झाली. शहरात ३७६७, तर ग्रामीणमध्ये ११,४०८ रुग्ण आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li