संगमनेरची जनता लसीकरणापासून वंचित राहू नये !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-शासनाच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येची योग्य ती आकडेवारी नसल्याने कोणताही व्यक्ती लसीकरणापासुन वंचीत राहिल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर कांदळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

वर्षापासून कोरोनाने थैमान घातले. लसीकरण हा खूप महत्वाचा भाग असल्याने तो शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. संगमनेरमध्ये सध्या व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेडसह रेमडीसीव्हरचा तुटवडा आहे.

लोकसंख्येच्या १ टक्का लोक उपाचार घेत आहे. संगमनेरची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या अंदाजे ४ लाख २२ हजार १३५ एवढी आहे. १० वर्षांत किती वाढ झाली याबद्दल कोणताच सक्षम अधिकारी खात्रीशीर सांगू शकत नाही.

१५०० बाधित उपचार घेत असून यासाठी आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. दुसरी लाट गंभीर असल्याने मृत्युचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यांत १० आरोग्य केंद्र असताना गर्दी होत आहे. नियोजन अभावी यंत्रणा कमी पडल्याने संसर्गात वाढ होऊ शकते.

आता राज्य शासनाने १८ वयापुढील सर्वांना लसीकरणाचा निर्णय घेतल्याने गर्दी वाढणार आहे. त्यातच अगोदरचे लसीकरण पूर्ण झाले नाही. अथवा दुसरा डोस अद्यापपर्यंत नागरिकांना मिळाला नाही.

यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व आरोग्य प्रशासनेन तालुक्यातील लाभार्थीपर्यंत लस पोहचविण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी कांदळकर यांनी निवेदनातून केली आहे.

२०११ जनगणनेनुसार अथवा अन्य बाबीवरून लोकसंख्येचा आकडा वाढून लोक लसीकरण मोहिमपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. संगमनेर तालुक्यात १० आरोग्य केंद्र असुन ६६ उपकेंद्र आहेत. या ठिकाणी लस पुरवठा उपलब्ध करून देत, लसीकरणाची परवानगी द्यावी.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|