आज ३७५३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२१९ बाधितांची रुग्ण संख्येत भर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६६ टक्के

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५३ हजार ५५९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ६७० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७४७ आणि अँटीजेन चाचणीत ७१५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५६, अकोले ४२, जामखेड १०९, कर्जत ०२, कोपरगाव ४५, नगर ग्रामीण ६९, नेवासा ५८, पारनेर ६०, पाथर्डी ४५, राहता ५९, राहुरी २७, संगमनेर ११५, शेवगाव ०३, श्रीगोंदा ३१, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ११, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७१, अकोले ६५, जामखेड ०९, कर्जत २८, कोपरगाव १२९, नगर ग्रामीण ३५९, नेवासा १३८, पारनेर १३७, पाथर्डी १०२, राहाता २३४, राहुरी १०४, संगमनेर २३९, शेवगाव ६६, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर २२५, कॅंटोन्मेंट बोर्ड ५२ आणि इतर जिल्हा १२३ आणि इतर राज्य ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७१५ जण बाधित आढळुन आले. मनपा ९०, अकोले १०, जामखेड ०८, कर्जत ०६, कोपरगाव ८३, नगर ग्रामीण ४८, नेवासा १०, पारनेर ५१, पाथर्डी १६, राहाता ६२, राहुरी ११२, संगमनेर २३, शेवगाव १३, श्रीगोंदा १७१, श्रीरामपूर ०६ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८६९, अकोले २३२, जामखेड ५५, कर्जत २९३, कोपरगाव १४६, नगर ग्रामीण ३३४, नेवासा १२०, पारनेर १५४, पाथर्डी १०७, राहाता २९९, राहुरी २१५, संगमनेर २१६, शेवगाव ११९, श्रीगोंदा १०९, श्रीरामपूर १९९, कॅन्टोन्मेंट १६६, मिलिटरी हॉस्पिटल ०९, इतर जिल्हा १०८ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,५३,५५९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२३६७०
  • मृत्यू:२०३०
  • एकूण रूग्ण संख्या:१,७९,२५९
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|