Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर करांसाठी अत्यंत महत्वाची बातमी दुचाकी वरून प्रवास करण्याआधी हे वाचाच !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढतच असून राज्यात व जिल्ह्या कडक निर्बंध असूनही रुग्ण संख्या कमी होत नाहीय ह्या पार्श्वभूमीवर आज एक नवा आदेश काढण्यात आला आहे. 

जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांकामी अत्यावश्यक सेवा व आदेशात नमुद इतर बाबी वगळता निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

Advertisement

तथापि, सूट असलेल्या सेवा/बाबीकरीता मोठया प्रमाणावर दुचाकीवर दोन व्यक्ती (डबलशिट) फिरत असल्याची बाब  निदर्शनास आल्याने प्रशासनाने १ मे रोजी नवीन आदेश जारी केला आहे. 

त्यानुसार आता जिल्हयामध्ये दि.02/05/2021 ते 15/05/2021 या कालावधीत दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्तीस (वैदयकीय कारण वगळून) प्रवासास मनाई करीत आहे.

Advertisement

उपरोक्त आदेशाची पोलीस विभाग, परिवहन विभाग व स्थानिक प्राधिकरणाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li