प्रियसीला भेटायला गेलेल्या तरुणाला नातेवाईकांनी टेरेसवरून ढकलून दिले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-प्रेमलाल कोणतीच बंधने नसतात, कारण सगळे बंधने तोडून प्रेमाची वाट मोकळी केली जात असते. मात्र या वाटेवर कधीकधी अनपेक्षित संकट देखील ओढवत असल्याचा प्रकार पिंपरी मध्ये घडला आहे.

मात्र या घटनेत प्रियकराला आपला जीव गमवावा लागला आहे. विवाहित महिलेला भेटायला गेलेल्या प्रियकर तरुणाला विवाहितेच्या नातेवाईकांनी चक्क टेरेसवरून ढकलून दिले. या दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू झाला आहे.

अक्षय अनिल काशिद (वय २०, रा. पवारनगर, थेरगाव), असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीगाव येथे शुक्रवारी (दि. ३०) ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला घराच्या बेडरुममध्ये पती व मुलीसह झोपल्या होत्या.

तसेच त्यांच्या पाठीमागील बेडरुममध्ये त्यांचा मामाचा मुलगा आरोपी कृष्णा पारधे व त्याची पत्नी हे दोघे झोपले होते. एवढ्या रात्री फ्लॅटचा दरवाजा वाजवला म्हणून फिर्यादीने दरवाजा उघडला असता मयत अक्षय काशिद तेथे असल्याचे दिसले.

बेडरूममध्ये कोण झोपलं आहे असा सवाल अक्षयने फिर्यादीला केला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे आरेपी कृष्णा पारधे बेडरुममधून बाहेर आला. तू कोण आहेस, तू येथे काय करतोस, असे कृष्णाने विचारले.

अक्षय व मी लग्न करणार आहे, तू त्याला काही बोलू नकोस, असे फिर्यादीने आरोपी कृष्णाला सांगितले. आरोपी कृष्णा त्याच्या साथीदारांना घेऊन आला. दरम्यान फिर्यादी या पहाटे तीनच्या सुमारास मयत अक्षय याला अपार्टमेन्टच्या टेरेसवर घेऊन गेल्या.

तेथे त्या अक्षयला समजावत असताना तेथे आरोपी कृष्णा व त्याचे मित्र बाळ्या व तौसिफ तसेच इतर आरोपीही तेथे आले.

त्यांनी मयत अक्षयला मारहाण केली. तसेच आरोपींनी अक्षय याला टेरेसवरून खाली ढकलून देऊन पळून गेले. यात जखमी झालेल्या अक्षय याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यानुसार आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|