शिर्डी संस्थानने कोरोनाला रोखण्यासाठी मदत करावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-आदिवासींबहूल अकोले तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत व योग्य उपचार करण्याबाबत आर्थिक मदत व वैद्यकीय तरतूद कमी पडत आहे. अशा परिस्थितीत शिर्डी संस्थान तटस्थ कसे काय राहू शकते.

शिर्डी संस्थानने यात लक्ष घालून राज्यात व अकोले तालुक्याला कोविड परिस्थितीतून मार्ग काढण्याबाबत आर्थिक व आवश्यक मदत करावी, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी केले.

अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले म्हणाले, अकाेले तालुक्यात लाॅकडाऊनमुळे सर्वांचे रोजगार बुडाले. शेतातील शेतीमाल विक्री करता येत नाहीत. ग्रामीण भागातील सर्वच रुग्णालय व खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडूंब भरली आहेत.

रेमडिसीवर इंजेक्शन्स मिळत नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. दानशूर लोकांकडून, अगस्ती साखर कारखाना, अगस्ती देवस्थान ट्रस्ट, बुवासाहेब नवले ग्रामीण व मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट संस्था,

प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अभिनव शिक्षण संस्था, इतर अनेक खासगी व सहकार क्षेत्रासह खासदार, आमदार,

नगरसेवक यांच्याकडून जिकिरीचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र तरीही ही मदत कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांच्या मदतीला शिर्डी संस्थान धावून येणार नसेल,

तर भविष्यात या संस्थानकडून कोणत्या अपेक्षा कराव्यात? शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाने साईबाबांच्या तिजोरीतून रुग्णांवर उपचार करण्याबाबत काम करण्याची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून काम करावे, असेही नवले यांनी सूचित केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|