Breaking News Updates Of Ahmednagar

जंगली प्राण्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-गेली अनेक महिने जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच एका जंगली प्राण्याच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यात व परिसरात बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग दहशतीखाली आसताना

Advertisement

आता तरसानीही परिसरात धुमाकुळ घालण्यास सुरवात केली आहे. आठ दिवसांपुर्वी तरसाच्या हल्यात उत्तम औटी या ५९ वर्षीय वृद्धचा मृत्यू झाला.

त्यापाठोपाठ पुणेवाडी फाटा येथील राजेंद्र सीताराम पुजारी (वय ४०) या तरुणावर तरसाने हल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. प्रंसगावधान राखुन राजेंद्र याने प्रतिकार केल्याने या दुर्घटनेत प्राण वाचले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li