Breaking News Updates Of Ahmednagar

अभिजीत बिचुकले यांचे डिपॉझिट जप्त

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- आपल्या बेताल वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले अभिजीत बिचुकले यांनी नेहमीप्रमाणे अपक्ष उमेदवारी अर्ज भरत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उडी घेतली होती.

मात्र नेहमीप्रमाणे इथेही माती खात त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.आज सकाळपासूनच पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे.

Advertisement

मात्र मतमोजणीसाच्या तब्बल १९ फेऱ्या पार पडल्यानंतर बिचुकलेच्या झोळीत ५४ मताचे दान मिळाले आहे. मराठी बीग बॉस या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिजीत बिचुकले यांनी यापूर्वी वरळी विधानसभा मतदार संघातूनही निवडणूक लढवली होती.

त्यांनतरपंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक आपणच जिंकणार, असा तथ्यहीन दावाही बिचुकले यांनी केला होता.

Advertisement

दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत २५ व्या फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी तब्बल ६२०० मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li