पोलिसांनी मदत केली नसती, तर ऑक्सिजनअभावी गेले असते २० जणांचे प्राण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-पुण्यातील कोथरूड पोलिसांना एक फोन आला. आमच्या रुग्णालयात तासाभराचाच ऑक्सिजन आहे. २० रुग्ण आहेत.

काही तरी मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने आणि नियोजन करून ऑक्सिजन सिलेंडर, ड्युरा कंटेनर रुग्णालयाला उपलब्ध करून दिला. पोलिसांनी वेळीच धावाधाव करत मदत केल्यानं २० रुग्णांचे जीव वाचले.

यामुळे शहरात पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले जात आहे. ही घटना आहे पुण्यातील. नाशिक येथे मागील आठवड्यात ऑक्सिजन दुर्घटनेत २४ रुग्णांचा मृत्यू झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यात अशाच पुनरावृत्ती होताना थोडक्यात टळली.

या घटनेबद्दल कोथरूड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामकुमार डांगे यांनी माहिती दिली. साहेब, आमच्या हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांना पुढील तासभर पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.

आपण काहीतरी मदत करा,’ असा फोन मला कृष्णा हॉस्पिटलमधून आला. त्या फोननंतर क्षणांचाही विलंब न करता काही मिनिटं थांबा आपण काही करून तिथेच ऑक्सिजन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुयात, असं मी डॉक्टरांना सांगितलं.

आपल्या परिसरात कोणत्याही व्यक्तीला काही रुग्णालयाच्या बाबतीत समस्या निर्माण झाल्यास त्यांच्या मदतीकरिता कोथरूड परिसरातील सर्व रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच व्हॉटस् अॅप ग्रुप केला होता.

त्यातील काही रुग्णालय व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्या चर्चेतून त्यांनी आसपासच्या काही रुग्णालयातून चार सिलेंडर मिळवले. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये पुन्हा फोन केला. आता यावर पूर्ण काम होईल ना?,’ अशी विचारणा केली.

सर आम्हाला साधारण यावर ४ ते ५ तास काम चालेल, असं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. आमचा ड्युरा कंटेनर आहे. तो आम्हाला शिवाजीनगर येथील एका प्लॅन्ट मधून भरून दिल्यास दिवसभराचे काम होईल. तोवर आमच्याकडे आणखी ऑक्सिजन उपलब्ध होईल,’

रुग्णालयाने सांगितलं. त्यानंतर डांगे काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इस्कॉट करून, पुढील तासाभरात रूग्णालयात ड्युरा कंटेनर उपलब्ध करून देण्यात आला. २० रुग्णांचे जीव पोलिसांनी वाचवल्याने कामगिरीचं कौतुक होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|