Breaking News Updates Of Ahmednagar

मोदी आता नक्की दाढी करतील…

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-पश्चिम बंगालमधील पराभवानंतर आता विरोधकांसह सोशल नेटवर्किंगवरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत आहे.

केवळ व्यंगचित्रच नाही तर अनेकांनी ट्विटरवरुन कमेंट्सच्या माध्यमातूनही मोदींनी आता तरी दाढी करावी आणि टागोरांसारखा दिसण्याचा प्रयत्न सोडून द्यावा असा टोला लगावल्याचं पहायला मिळत आहे.

Advertisement

आता तरी टागोरांसारख्या दिसण्याचा नाद सोडून मोदी दाढी करतील का?, असा प्रश्न अनेकांनी ट्विटरवरुन विचारला आहे. काहींनी मोदी आता नक्की दाढी करतील असे म्हटलं आहे.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनीही एका व्यंगचित्राच्या माध्यमातून अशाच पद्धतीची टीका केली आहे. या व्यंगचित्रामध्ये टागोर मोदींना दाढी करण्यासाठी रेझर ब्लेड देताना दिसत आहेत.

Advertisement

त्यावर मोदी केवळ, “गुरुदेव” असं म्हणताना दाखवण्यात आलं आहे. सतीश यांचं हे व्यंगचित्र प्रचंड व्हायरल झाले. केवळ चार तासांमध्ये तीन हजार ७०० हून अधिक जणांनी ते रिट्विट करुन शेअर केलं आहे.

कोरोना कालावधीत मोठ्याप्रमाणात प्रचारसभा घेऊनही भाजपाला पराभव पत्करावा लागत असल्याने मोदींसहत अमित शाह आणि भाजपावर विरोधकांनी टीका करत ममतांचं कौतुक केलं आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लूकवरुनही आता टीका होऊ लागली आहे. बंगालमधील जनतेला मतदानासाठी संबोधित करताना मोदींनी रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखा लूक ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सोशल नेटवर्किंगवर सुरु होती.

मात्र आता या लूकचाही मोदींना काही फायदा झाला नाही, त्यांनी दाढी कापावी असा खोचक टोला विरोधकांनी ट्विटरवरुन लगावलेला दिसत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ता मिळवता आली नसली तरी

Advertisement

आसाममध्ये भाजपाने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सत्तांतराची लाट बघायला मिळाली आहे. तामिळनाडूतील मतदारांनी द्रमुकच्या हाती सत्ता सोपवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li