Breaking News Updates Of Ahmednagar

नगरपरिषदेने सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावे

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कोपरगाव मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून कोपरगावमध्ये एकच एच.आर.सीटी केंद्र आहे.

कोपरगांवची कोरोनाची परिस्थिती पाहता पालिकेने फंडातून एच.आर.सी.टी. स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावे,अशी मागणी भारतीय जनता पार्टी गटनेते रविंद्र पाठक, शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल व उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक जनार्दन कदम,

Advertisement

आरीफ कुरेशी, शिवाजी खांडेकर यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, आपल्या देशामध्ये वाढत असलेल्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करुन लढा देत आहे मात्र पुरेशा साधन सामग्री अभावी रुग्णांना सेवा देण्यात फार मोठया प्रमाणात अडथळे येत आहेत.

Advertisement

त्यामुळे कोपरगांव शहर व ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून रुग्णवाढ रोखण्याकरिता मोठया प्रमाणात उपाय योजना करणे गरजेचे आहे.

शहरात एकच एच.आर.सीटी स्कॅन मशीन असल्याने तालुक्यातील विविध गावातून नागरिक तपासणीसाठी येत असतात. यासाठी बराच वेळ जातो.

Advertisement

त्यामुळे रुग्णांना व नातेवाईकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. त्याकरिता मानवतेचा दृष्टीकोन समोर ठेवुन आपण नगरपरिषदेच्या नगरपालिका फंडातून तातडीने एच.आर.सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव द्यावा.

नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा घेवून त्यामध्ये सदरचा ठराव आम्ही सर्वानुमते मंजुर करुन देण्यास तयार आहोत. यामुळे गोरगरिब जनतेला दिलासा मिळून त्यांना लवकरात लवकर उपचार घेणे सोयीस्कर होवून त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li