ह्या लोकांना कोरोना परिस्थिती गंभीर होण्याचा धोका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-उंचीच्या तुलनेत आवश्यक वजनापेक्षा अधिक वजन असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो.

अशा लोकांमध्ये कोरोना संसर्ग झाल्यानंतर प्रकृती गंभीर होण्याची शक्यतादेखील वाढते. विशेष म्हणजे ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत २० ते ३९ वयोगटातील लोकांना अधिक वजनामुळे कोरोना परिस्थिती गंभीर होण्याचा धोका अधिक असल्याचे एका वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे.

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) अर्थात शारीरिक उंची आणि वजनाच्या गुणोत्तराचा सूचकांक आणि कोरोना संसर्गातील धोके यांचा अभ्यास केला. अशा प्रकारचा हा पहिलाच मोठा अभ्यास आहे.

इंग्लंडमधील सुमारे ६९ लाख लोकांवर हा अभ्यास आधारित आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णालयात भरती कराव्या लागलेल्या आणि त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या २० हजार रुग्णांचादेखील या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे.

या अभ्यासात संशोधकांना आढळले की, २३ किलो प्रति चौरस मीटर इतका बीएमआय असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गानंतर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे हा बीएमआय सुदृढ शरीरयष्टीच्या श्रेणीत येतो.

बीएमआयमध्ये एका युनिटची भर म्हणजे रुग्णालयात दाखल करावी लागण्याची शक्यता ५ टक्क्यांनी, तर आयसीयूमध्ये दाखल करण्याची शक्यता १० टक्क्यांनी वाढते.

बीएमआय इंडेक्सनुसार कमी वजन असलेल्या १८.५ किलो प्रति चौरस मीटर लोकांमध्येदेखील कोरोना परिस्थिती गंभीर झाल्याचे आढळले आहे. २० ते ३९ वयोगटातील लोकांना कोरोना संसर्गानंतर प्रकृती गंभीर होण्याचा धोका आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|