Breaking News Updates Of Ahmednagar

जिल्ह्यातील या तालुक्यात सव्वा दोन कोटींचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात सध्या कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळली आहे.

त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. त्यातही ऑक्सिजन अथवा कृत्रिम प्राणवायुची गरज असलेल्या रुग्णांचाच भरणा अधिक असल्याने राज्यासह जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

मात्र याच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोले तालुक्यात 2 कोटी 27 लाखांचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग सेंटर प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये साकारणार आहे.

भविष्यात येथे उपजिल्हा रुग्णालय होणार असून त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उपयोगी पडेल, असे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी स्पष्ट केले. तालुक्यात कोविड केअर केंद्रात 850 बेड असून, सध्या 650 सक्रिय कोविड रुग्ण असून 200 रुग्ण संगमनेर, नाशिक व अहमदनगर येथे सोयीनुसार उपचार घेत आहेत,

Advertisement

अकोलेत बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन बेडची कमतरता भरून काढण्यासाठी तालुक्यातील सर्व गुरुजन शिक्षक व सर्वपक्षीय कार्यकर्ते सक्रीय योगदान देत आहेत. सुगाव येथे शिक्षकांच्या पुढाकाराने 60 ऑक्सिजन बेडचे कोरोना सेंटर सुरू होत आहे.

राष्ट्रवादी, भाजप, सेना, काँग्रेस अशा सर्वांचे सहकार्य मिळत आहे. तालुक्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कोविड परिस्थिती सक्षमपणे हाताळत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेने अकोलेची सरकारी आरोग्य यंत्रणी चांगली आहे. अशी माहिती आमदार लहामटे यांनी दिली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li