Breaking News Updates Of Ahmednagar

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री शेत्र तहाराबाद येथील श्री संत महिपती महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँक चे माझी अध्यक्ष रावसाहेब कोंडाजी साबळे वय (79) यांचे दुःखद निधन झाले .

साबळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुरी कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणावर घरोघरी कर्ज वितरण केले होते.

Advertisement

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दारोदारी ट्रॅक्टर दिसत होते. साबळे यांनी सहकार, धार्मिक, शेती, राजकीय या क्षेत्रांमध्ये मोठे काम केले .साबळे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे.

साबळे यांनी राजकारणाची सुरुवात रामपूर येथून सुरुवात केली. रामपूर सोसायटीचे अध्यक्ष त्यांनी भूषवले .

Advertisement

अनेक धार्मिक, स्वयंसेवी, राजकीय संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li