Breaking News Updates Of Ahmednagar

महापालिकेने वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे; आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर सुरु आहे. यातच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या हि नगर शहर व तालुक्यातच आढळून येत आहे.

यामुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. यातच अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण बंद करण्यात येत आहे.

Advertisement

यातच शहरातील परिस्थिती पाहता लसीकरण मोहीम वाढविणे गरजेचे आहे. यातच महापालिकेने वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

18 ते 45 वयोगटासाठी मोफत लस सुरू झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. तेथे कोवीड नियमांचा फज्जा उडत आहे. लसीकरण केंद्राची नगर शहरातील संख्या कमी असल्याने असले प्रकार होत आहे.

Advertisement

लसीकरण केंद्राच्या जागेसाठी अडचण असेल तर खासगी जागा देण्यासाठी आपण पुढाकार घेवू. सामाजिक संस्थाही जागा देण्यास तयार असून तसेच शाळा खोल्यांमधून केंद्र सुरू करता येणे शक्य आहे.

बारस्कर यांनी पत्रात सावेडी उपनगराचा उल्लेख केला असून शहरातही वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव बारस्कर यांनी आयुक्तांना दिला आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li