Breaking News Updates Of Ahmednagar

बाळ बोठेच्या मनामध्ये कोणतीही भिती नसल्याचे सिद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पहिल्याच आयफोनचे लॉक अदयाप उघडलेले नसताना त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीमध्ये मोबाईल आढळून आल्याने बोठेच्या मनामध्ये कोणतही भिती नसल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे बोठे यास पारनेर येथील दुययम कारागृहात ठेवणे घातक ठरू शकते. बोठे याच्यासारख्या अटटल गुन्हेगारास नगर येथील कारागृहात हालविणे योग्य राहिल अशी निवंती मयत रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे तसेच त्यांचे वकील सचिन पटेकर यांनी पोलिस अघिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

Advertisement

आरोपींकडे मोबाईल :- सोमवारी पोलिस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बोठे पारनेर येथील ज्या कोठडीत आहे, त्या कोठडीतील दोन आरोपींकडे मोबाईल आढळून आले आहेत. कारागृहातील पाणी बाहेर जाण्याच्या पाईमध्ये ते ठेवण्यात आल्याची माहीतीही चौकशीत पुढे आली आहे.

पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल :- यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कोठडीत असलेल्या पत्रकार बाळ बोठे याच्यावर रेखा जरे यांच्या हत्येसह खंडणी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Advertisement

मोबाईल बोठे यानेही वापरल्याचा संशय :- या कोठडीतील आरोपींकडील मोबाईल बोठे यानेही वापरल्याचा संशय जरे व पटेकर यांनी या निवेदनात व्यक्त केला आहे. बोठे याने हा फोन वापरून आणखी दुसरे काही नियोजन तर केले नसावे ना ?

कोणाकोणास संपर्क साधण्यासाठी त्याने हा मोबाईल वापरला असेल ? जरे यांच्या हत्याकांडात वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचे लॉक उघडत नसल्याने पोलिसांनी तो फॉरेन्सीक लॅबकडे पाठविला आहे.

Advertisement

त्याचा अहवाल अद्याप पावेतो येणे बाकी आहे. त्यातच दुसऱ्या फोेनचा विषय पुढे आल्याने या निवेदनात अश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

बोठे याने केलेल्या गुन्हयाचे स्वरूप पाहता तो कोठडीतही मोबाईल वापरत असेल तर त्याने केलेल्या गुन्हयांबाबत त्याच्या मनामध्ये कोणतीही भिती दिसत नाही.

Advertisement

जूनही बोठे यास पारनेर येथील दुय्यम कारागृहात ठेवणे किती घातक ठरू शकते हे कोठडीत सापडलेल्या मोबाईलच्या ज्वलंत उदाहरणावरून स्पष्ट होते. त्यामुळे या अट्टल गुन्हेेगारास नगर येथील कारागृहात हालविणे हेच योग्य राहणार आहे.

अन्यथा यात असंख्य जिव जाण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे जरे व पटेकर यांच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक तसेच पारनेरच्या पोलिस निरीक्षकांना पाठविण्यात आल्या आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li