लसीकरणाचा फज्जा ! नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर निदर्शने

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर शहरात महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ पहायला मिळाला.

सर्व्हर बंद पडल्याचे कारण सांगत लसीकरण बंद करून कर्मचारी निघून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना अनेक तास उन्हात ताटकळत थांबावे लागले. लसीकरण पुन्हा सुरू होणार की नाही हे निश्चित सांगितले जात नसल्याने अखेर नागरिक संतापले.

यावेळी तिथे उपस्थित मनसेच्या कार्यकर्त्यांनी लसीकरण केंद्रा बाहेरील रस्त्यावर ठाण मांडून मनपा प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी परस्थिती संवेदनशील होत असताना पोलिसांना लसीकरण केंद्रावर पाचारण करण्यात आले.

मनसेचा राजकारण्यांवर गंभीर आरोप :- शहरात आपल्या समर्थकांचे त्यांच्या घरातील सदस्यांचे लसीकरण मागच्या दाराने करण्याकरीता आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी,

दबाव आणण्याचा प्रकार शहरातील नगरसेवक तसेच स्थानीक राजकीय नेते करत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईन मध्ये उभे राहून सुध्दा आश्या राजकिय लोकांमुळे लस मिळत नाही.

…त्या लोकांवर गुन्हे दाखल करा :- मागच्या दाराने होणारे लसीकरण बंद करा जो नगरसेवक राजकिय नेते आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दमदाटी लसीकरण करण्याकरिता करत असेल अश्या लोकांवर गुन्हे दाखल कर, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|