कसे रोखणार कोरोनाला? जिथे कोरोनाचा विस्फोट तिथेच लसीचा तुटवडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-लसीची उपलब्धता होत नसल्याने राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावर शुक्रवारपर्यंत लस उपलब्ध होईल की नाही? याबाबत शंका उपस्थत होऊ लागली आहे.

केंद्रावर लस शिल्लकच नसल्याने अनेक नागरिकांना लसीकरणासाठी ताटकळावे लागत आहे. दरम्यान राहता तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असताना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने कोरोनाला अटकाव कसा घालावा हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे..

दरम्यान तालुक्यात सोमवारी लसीकरणाचा दिवस असल्याने सर्वच केंद्रावर लस संपल्याचे बोर्ड लावल्याचे दिसून येत होते. करोनाचा संभाव्य धोका टाळण्याकरिता शरीरातील प्रतिकारशक्ती प्रभावी व सक्षम असण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.

याबाबत आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने नागरिक लस घेण्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत. मात्र परिस्थिती बदलली आहे. लसीच्या संख्येच्या तुलनेत लस घेणारांची संख्या दुप्पट तिप्पट असते.

लसीचा तुटवडा असल्याने लोकांना लस मिळणे कठीण झाले आहे. करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एक महत्वपूर्ण पर्याय ठरू शकतो.

म्हणून शासनाने लसीकरणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडे लसीकरणासाठी केंद्रावर येणारांची वाढती गर्दी, त्यातच लस येईल याची शाश्वती नाही.

लसीकरण केंद्रांवर दररोज 300 ते 400 नागरिक लसीकरणासाठी येतात. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीचे सुद्धा रजिस्ट्रेशन होत असून आपला लसीकरणासाठी केंव्हा नंबर येईल व लस घेऊन आपण केव्हा सुरक्षित होऊ या प्रतिक्षेत अनेकजण आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|