Breaking News Updates Of Ahmednagar

आयपीएलच्या या मराठमोळ्या खेळाडूची कोविड सेंटरसाठी मदत

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-आयपीएलमध्ये खेळणाऱ्या पुण्याच्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने लोणीव्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ कोविड सेंटरसाठी 1 लाखाची मदत करण्याची घोषणा केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब नाहाटा यांनी लोणी व्यंकनाथ येथे कोविड सेंटर सुरु केले आहे. त्यावर ऋतुराज गायकवाडने पुण्यातील एका मित्राच्या मार्फत नाहाटांशी संपर्क साधला.

Advertisement

व ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना जीवनदान देण्यासाठी एक लाखाची मदत जाहीर केली. अन्य खेळाडुंकडून मदत मिळवून देण्यासाठी ऋतुराज गायकवाड मदत करणार असल्याचे समजते.

तसेच लोणी व्यंकनाथ येथील कोविड सेंटरला किर्लोस्कर कंपनीची टीमही भेट पाहणी करून मदत करणार असल्याचे समजते.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li