महसूलमंत्री थोरात म्हणाले…पत्रकारांचे प्राधान्याने लसीकरण करावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोनाच्या संकटात राज्यातील विविध पत्रकार वृत्त संकलनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

म्हणून या सर्व पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देत त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांना मोफत लसीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या सर्व संकटकाळात राज्यातील विविध पत्रकार वृत्त संकलन करण्याच्या निमित्ताने सातत्याने घराबाहेर असतात. यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.

यातून पत्रकारांचे कुटुंबातील सदस्यही मोठ्या प्रमाणात बाधित होऊ शकतात म्हणून राज्यातील सर्व पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देत तातडीने लसीकरण करण्यात यावे.

या धावपळीच्या जीवनामुळे अनेक पत्रकारांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे कुटुंबीयही सातत्याने काळजीत असतात.

याच धर्तीवर महाराष्ट्रातही तातडीने सर्व पत्रकारांचे लसीकरण लवकरात लवकर करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|