Breaking News Updates Of Ahmednagar

जी भीती होती, ती अखेर खरी ठरली!; रोहित पवारांचं ते वाक्य ठरले खरे !

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. तब्बल ६६ दिवसांनंतर देशात इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १८ पैसे प्रति लिटर महागले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. निकालनंतर अशी दरवाढ होऊ शकते,

Advertisement

अशा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. त्यामुळे जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

मोदी सरकारने इंधन दरवाढ केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं एक ट्विट व्हायरल होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर मोदी सरकार इंधन दरवाढ करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

Advertisement

त्यांचं हे ट्विट नेटकऱ्यांकडून चांगलंच व्हायरल केलं जात आहे.रोहित पवार यांनी 2 मे रोजी म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एक ट्विट केलं होतं. आता चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले आहेत.

त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलं आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं.

Advertisement

त्यांचं हे भाकीत खरं ठरल्याने नेटकऱ्यांनी हे ट्विट व्हायरल केलं असून त्यावर कमेंटचा पाऊसही पाडला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li