शिक्षकांनी उभारलेल्या कोविड सेंटरचे दोनदा उद्घाटन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-अकोले तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक,शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन प्राध्यापक, दानशूर व्यक्ती व सहकारी संस्था यांचे सहकार्याने उभे राहिलेल्या ५० ऑक्सिजन बेडची सुविधा असणाऱ्या सुगाव खुर्द येथील कोविड सेंटरचे काल लोकार्पण करण्यात आले.

मात्र उदघाटनासाठी आमंत्रित केलेले सर्व मान्यवर येण्यापूर्वीच उदघाटनाची घाई करण्यात आली. त्यामुळे एकाच कोविड सेंटरचे दोन वेळा फित कापून उद्घाटन करावे लागले.या उद्घाटन कार्यक्रमासाठी पद्मश्री राहीबाई पोपेरे, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख,

आ.डॉ.किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड आदींना आमंत्रित करण्यात आले होते. आ.लहामटे कार्यक्रमस्थळी वेळेवर आले. मात्र, तोपर्यंत अन्य मान्यवर येथे पोहचले नव्हते. आमदारांना नाचणठाव येथील उपोषण सोडण्यास जावयाचे असल्यामुळे ते उद्घाटन करण्याची घाई करत होते.

तर काही जण अन्य मान्यवर लवकरच पोहचतील, असे सांगत होते. आ.डॉ.लहामटे यांनी नाचणठाव येथे उपोषण सोडण्यास मला जायचे आहे, पाहुणे आल्यावर तुम्ही परत उद्घाटन करुन घ्या,असे सांगून फित कापून ते व त्यांचे समर्थक निघून गेले.

त्यानंतर पद्मश्री राहिबाई पोपेरे व निवृत्ती महाराज देशमुख यांचे आगमन झाले. त्यांचेसह माजी आमदार वैभवराव पिचड, जि.प. सदस्य तथा सुगाव रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष कैलासराव वाकचौरे, भाजप नेते जालिंदर वाकचौरे, अ­ॅड.वसंतराव मनकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुन्हा फित कापण्यात आली.

तालुक्यातील काही सर्वपक्षीय युवक व सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. या कोविड सेंटरच्या उभारणीची मुळ कल्पनाही त्यांचीच.

या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने युवा स्वाभिमानीचे संस्थापक महेशराव नवले यांनी उद्घाटनप्रसंगी जो प्रकार घडला तो घडायला नको होता. कुणालाही डावलून उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न नव्हता.झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र सदगीर म्हणाले, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक यांनी मिळून हे दिशादर्शक काम हाती घेतले आहे. तहसिलदार मुकेश कांबळे ,वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय घोगरे,

डॉ. इंद्रजित गंभीरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे यांचेसह जिल्हा बँकेेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर, दिपक महाराज देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छद्रिं धुमाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे,

युवक तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशुराम शेळके, रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन शेटे, अगस्तिचे संचालक महेशराव नवले,प्रदिप हासे, दत्ता नवले, नितीन नाईकवाडी, शिवाजी नेहे, हेमंत दराडे, अमोल वैद्य, गणेश आवारी,

अजय वर्पे ,संदीप शेणकर, सचिन खरात, रामहरी तिकांडे, भाऊपाटील नवले, रमेश जगताप, संदीप शेटे,अशोक भळगट, विक्रम नवले, राजेंद्र गोडसे, प्रा.डॉ. संजय ताकटे, राज गवांदे, राहुल देशमुख, किरण चौधरी,

आत्माराम रंध्ये,सरपंच शुभांगी वैद्य, उपसरपंच डॉ.धनंजय वैद्य, सुगाव सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब वैद्य, ॲड. बी. जी. वैद्य,शांताराम वैद्य, चंद्रकांत पवार यांचेसह शिक्षक प्रतिनिधी व विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|