Breaking News Updates Of Ahmednagar

या भयंकर परिस्थितीत लोकप्रतिनिधी काय करतायत? माजी आमदार स्नेहलता कोल्हे

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचे हजारोच्या संख्येने बाधित आढळून येत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळते आहे.

राहाता, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र तरीही या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित कामे केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

यातच राहाता तालुक्यातील चितळीसारख्या गावात एक महिन्याच्या कालावधीत मृत्यूचे अर्धशतक गाठलेले आहे.

ही चिंतेची बाब असून प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच या भयंकर परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी काय करत आहेत, असा सवाल भाजपा प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

यावेळी बोलताना माजी आमदार कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव मतदारसंघातील रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

दिवसागणिक वाढत असलेली रुग्णसंख्या ही अतिशय मोठी चिंतेची बाब असून मतदारसंघातील चितळीसारख्या गावातही अक्षरक्ष: कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करून घ्यावे.

Advertisement

तसेच वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु, योग्य ते नियोजन न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली. किमान आतातरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li