Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर मध्ये पत्रकारासह त्याच्या कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-केडगाव मधील पत्रकार मुरलीधर तांबडे व त्यांच्या कुटुंबीयांना चौघा जणांनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला

याप्रकरणी अभिजीत अजिनाथ तांबडे (१८, रा. शास्त्रीनगर, केडगाव) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

आरोपींमध्ये मच्छिंद्र घोगरे, तुषार मच्छिंद्र घोगरे, राहुल ससाणे व विशाल कोतकर यांचा समावेश आहे. ३ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मी माझे काम उरकून घरी जात असताना दूधसागर सोसायटीच्या जवळ तुषार, राहुल व विकास यांच्यासह चार-पाच जणांचे आपसात भांडण चालू होते.

त्यावेळी मी तुषार याला ‘काय झाले, असे विचारून भांडण सोडवले. त्यानंतर ४ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपींनी आमच्या घरी येत, ‘तू रात्री आम्हाला मारायला पोरं आणतो काय’, असे म्हणून शिवीगाळ सुरू केली.

Advertisement

‘मी तुम्हाला मारायला पोरं आणली नव्हती’, असे म्हटले असता त्यांनी मारहाण केली. मारहाण सोडवण्यासाठी आई सुनीता तसेच वडील अजिनाथ, चुलते मुरलीधर, चुलती रेना हे मध्ये आले असता, या आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली.

मच्छिंद्र घोगरे याने चुलीमध्ये जळत असलेले लाकूड काढून मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई मध्ये आली असता मच्छिंद्र घोगरे याने जळते लाकूड आईच्या पोटावर मारून तिला जखमी केले. आरडाओरड केली असता आरोपी तिथून पळून गेले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li