Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोना बाधिताची लूट शासनाने थांबवावी

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोरोना बाधित रुग्णांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन वैद्यकीय क्षेत्रात काही मंडळीकडून सुरू असलेली लूटमार शासनाने थांबवावी, अशी मागणी पिंपरी अवघड येथील शेतकरी संघटनेने कार्यकर्ते सुरेश लांबे यांनी केली.

वेळेवर आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने राहुरी तालुक्यात कोरोना बाधितांचे हाल सुरू आहेत. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा स्थानिक पातळीवर तुटवडा झाल्याने नागरिकांना उपचारासाठी तालुक्याबाहेर जाण्याची वेळ आली.

Advertisement

या इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री करून रुग्णांची लूट केली जात आहे. रॅपिड अँन्टिजेन तपासणीसाठी किट उपलब्ध नाहीत. कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा झाल्याने बाधितांच्या उपचाराची गैरसोय झाली.

ग्रामीण भागातील वाडीवस्तीवर जावून लस देण्याची गरज आहे. जेणेकरून बाधीत रुग्ण संख्या घटण्यास मदत होईल. पळून जाताना, आम्ही येथील स्थानिक आहोत, आमच्या नादाला लागू नका, नाहीतर सोडणार नाही, अशी धमकी दिली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li