खुशखबर ! आणखी एका कोरोना प्रतिबंधक औषधाला मंजुरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- डीआरडीओच्या संशोधकांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) असे या औषधाचे नाव आहे. भारतातील कोरोना ग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समजत आहे. 2 डेक्सोय डी ग्लुकोजचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, असंही डीआरडीओने म्हटलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती ऐवजी 2 डेक्सोय डी ग्लुकोजचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे.

जाणून घ्या औषधाबाबत :- 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) हे औषध पावडर (पूड) स्वरुपात उपलब्ध आहे. हे औषध पाण्यास मिसळून ते पाणी पिण्यासाठी दिले जाते.दररोज ठराविक प्रमाणात औषधमिश्रीत पाण्याच्या सेवनाने कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घातला जातो आणि रुग्ण लवकर बरा होतो.

हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) हे औषध प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांमध्ये आढळले. यानंतर डीसीजीआयने डीआरडीओच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|