… तर कोरोनाची तिसरी लाट रोखणे शक्य !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-देशात कोरोनाची तिसरी अटळ असल्याचा इशारा देणारे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी तिसरी लाट रोखता येऊ शकते, असा दावा केला आहे.

राघवन यांनी तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर निर्बंधांची गरज व्यक्त करत इतर उपाययोजनांचे मार्गदर्शन केले असून, आरोग्य यंत्रणेसह प्रशासन आणि जनतेने आता या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना राघवन यांनी तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला होता. तिसरी लाट येणारच.

मात्र नेमकी कधी येईल, तिची तीव्रता किती असेल, हे तूर्तास सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले होते. केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनीच तिसरी लाट अटळ असल्याचे

सांगितल्यानंतर सर्वच यंत्रणांचे धाबे दणाणले होते. दुसऱ्या लाटेचा सामना करतानाच दमछाक झालेली असताना तिसऱ्या लाटेला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न भेडसावत होता.

या प्रश्नावर राघवन यांनीच उत्तर दिले आहे. कठोर निर्बंधांसह आवश्यक उपाययोजना केल्या तर तिसऱ्या लाटेला रोखता येऊ शकते, असे राघवन यांचे म्हणणे आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|