अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदारांवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ही कोरोनाबाधित होत आहेत, पाथर्डी – शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत असल्याने ५ मे पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मागील महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठका कार्यक्रम तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरच्या उभारणीसाठी झालेल्या धावपळी दरम्यान त्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने दि.२४ एप्रिल पासून होम क्वारंटाइन होत्या.

यामुळे महसूलमंत्री ना.थोरात यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीस सुद्धा त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

याच दरम्यान पाथर्डी व शेवगाव येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेन्टरच्या कार्यक्रमासही त्या अनुउपस्थित होत्या.

परंतु या कालावधीत त्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गा संदर्भात प्रशासन व आरोग्य विभागाशी सातत्याने संपर्कात होत्या.

दरम्यान घरी उपचार घेत असतांना त्रास वाढल्याने त्यांना दि. ४ मे रोजी नगर येथील एका खाजगी रुग्णालयात नंतर दि. ५ मे रोजी त्यांना मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु असून, उपचारासाठी त्यांची प्रकृती योग्य साथ देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|