ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

सरपंचांचा पुढाकार आणि जिल्ह्यातील ‘हे’ छोटेसे गाव झाले कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. एकीकडे संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना मात्र दुसरीकडे नगर तालुक्‍यातील एका छोट्याशा भोयरे खुर्द गाव कोरोनामुक्त झाले आहे.

सोशल डिस्टसिंगबरोबर इतर नियमांचे पालन केल्यानेच या गावातून कोरोना हद्दपार झाला. हिवरे बाजार हे गाव आपल्या कुशल कामगिरीने 15 मे रोजी कोरोनामुक्त होत आहे.

Advertisement

शेजारीच असलेल्या हिवरे बाजार या आदर्श गावाची प्रेरणा घेत आधी भोयरे खुर्द हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. विशेष म्हणजे येथे मृत्यू दर शून्य आहे.

भोयरे खुर्द हे एक छोटंसं गाव असून गावाची लोकसंख्या लगभग दीड हजाराच्याआसपास आहे. या गावचे सरपंच राजू आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने करून दाखवलं.

Advertisement

गाव कोरोनमुक्त झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण जिल्हा त्रस्त असताना मागील 15 दिवसांपासून एकही कोरोना बाधित रुग्ण या गावात आढळला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना गावात सुरू असून सर्व नियमांचे येथील गावकरी पालन करतात.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li