ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पाणीपट्टी घेता… किमान पाणी तरी स्वच्छ द्या; दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-गेल्या काही दिवसांपासून शेवगाव शहराला पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती आहे,

Advertisement

यामध्ये नागरिक जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे तर दुसरीकडे शेवगाव तालुक्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

हक्काने पाणीपट्टी वसूल करता मग पाणी शुद्ध देण्याची जबाबदारी कोणाची आहे ? असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहे.

Advertisement

लोकप्रतिनिधींना घेणे देणे नाही… :- एकीकडे कोरोनाच्या या महाभयंकर स्थितीत सर्वजण जीवासाठी धडपडत आहे. काही लोकप्रतिनिधी जीवाचा पर्वा न करता जनसेवा करण्यात मग्न आहे,

तर दुसरीकडे तालुक्यातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी केवळ स्वतःची काळजी घेण्यात मग्न आहे. नागरिकांच्या या मुलभुत प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले असते तर प्रश्न सुटला असता असा असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Advertisement

शेवगाव शहरातील नळांतून सध्या पिवळसर व दुर्गंधयुक्त वास असणारे पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे ऐन करोना संसर्गाच्या संकाटात शेवगावकरांसमोर आणखी कोणते संकट उभे राहणार यामुळे नागरिक चिंतेत आहेत.

दरम्यान, या पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहेक. शहरातील विविध प्रभागांना 8-9 दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो.

Advertisement

कधी पिवळसर तर कधी गाळयुक्त, तर कधी दुर्गंधीयुक्त पाणी येते. मागील अनेक वर्षांपासुनचा हा भिजत पडलेला पाणी प्रश्न विधानसभा मतदारसंघ व नगरपरिषदेत पक्षीय सत्तांतर झाले तरी कोणालाही सोडवता आलेला नाही.

Advertisement
li