‘या’ तालुक्यात प्रत्येकाची घरोघर जाऊन कोरोना टेस्ट होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-पारनेर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अनेक दिवसांपासून तीनशेच्या आसपासच आहे. रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही.

यामुळे कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पारनेर शहरात प्रत्येक प्रभागात व घरोघर जाऊन प्रत्येकाची कोरोना टेस्ट करण्याचा निर्धार तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे.

महसूल विभाग, नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून पारनेर शहर कोरोनामुक्त करण्याचा संकल्प तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे. शहरात टेस्टिंग मोहिमेला सुरूवातही झाली आहे.

दरम्यान विषेशबाब म्हणजे सकाळपासून २०० जणांची तपासणी झाली आहे. त्यात २० बाधित आढळून आले. तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तहसीलदार देवरे यांनी पारनेर शहर कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

त्यासाठी त्यांनी नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या सहकार्याने शहरातील प्रभागनिहाय कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

पारनेर शहरातील रूग्ण संख्या कमी व्हावी, शहर कोरोनामुक्त व्हावे, या साठी आता प्रभागनिहाय व घरोघर जाऊन कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. शहरात एकही रूग्ण उपचाराविना व घरात राहाणार नाही. त्यामुळे शहर कोरोना मुक्त होण्यास मदत होईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|