ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आमदार रोहित पवार स्वत:चा फोटो लाऊन आपली टिमकी वाजवतात !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जामखेड येथील आरोळे कोविड सेंटर हे शासकीय आहे. या सेंटरला केंद्र सरकार व राज्य सरकार मदत करत आहे, असे असताना फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो लावणे आवश्यक आहे.

परंतु रोहित पवार हे आपला स्वत:चा फोटो लाऊन प्रसिद्धी मिळवून आपली टिमकी वाजवत आहेत. त्यांना प्रसिद्धीची खूपच हौस असेल, तर स्वतःच्या अर्थसहाय्यातून कोविड सेंटर उभे करावे आणि पाहिजे तेवढे फोटो लावावेत, असा आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला.

Advertisement

माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी शहरातील सर्व खासगी कोविड सेंटरला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात सर्व विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन नंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

खासगी कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत. पण आॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. याला शासन जबाबदार आहे. आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत. जाणीवपूर्वक आम्हाला आॅक्सिजन दिले जात नाही, असे खासगी डॉक्टरांनी सांगितले.

Advertisement

रेमडेसीवीर इंजेक्शन हे मोठ्या प्रमाणावर बारामतीला मिळतात, मग जामखेडला का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. आ रोळे हॉस्पिटल हे रेमेन मॅगसेसे रजिकांत आरोळे यांनी उभे केले. आता त्यांची मुले शोभा व रवी आरोळे हे चांगल्या प्रकारे कोविड सेंटर चालवत आहेत.

आज अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. लस देताना देखील आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज येणाऱ्या लोकांना लस देत नाही. परंतु जे आले नाही त्यांना लस पोहोच करतात.

Advertisement

मुत्यूचे आकडे देताना वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय वाघ सांगतात ११२, तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते सांगतात १४६ यावरून अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसत नाही.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु सरकार बदलतातच आघाडी सरकारने न्यायालयात युक्तिवाद बरोबर केला नाही. त्यामुळे आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असे वाटते, असे शिंदे यांनी सांगितले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li