ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

उत्तर नगरमध्ये दहा योगभवन उभारणार – खा.लोखंडे

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी साडे सहा कोटी विशेष निधी प्राप्त होत आहे. या निधीतून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे योगभवनाची उभारणी होणार आहे.

नेवासा,देवळाली प्रवरा,राहाता,शिर्डी,संगमनेर,अकोला या नगरपालिकेसाठी प्रत्येकी रू ८० लाख तर श्रीरामपूर व कोपरगांव नगरपालिकांना ७५ लाखांचा निधी दिला जाणार आहे. यामधून १० योग भावनांची निर्मिती होणार असून याकामी निधी कमी पडल्यास तो उपलब्ध करुन देऊ,

Advertisement

असे प्रतिपादन खा.सदाशिव लोखंडे यांनी केले.राहाता नगरपालिका सभागृहात आयोजित केलेल्या पत्र वाटप कार्यक्रमात खा. लोखंडे बोलत होते.मुख्यमंत्री उद्धवठाकरे व नगर विकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्यामुळे हा निधी प्राप्त होत असल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले,शिर्डी येथे सरकारी लसीकरण केंद्र करण्यात यावे व मोफत लस देण्यात यावी,अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली आहे. शिर्डी येथील परिचरिक व परिचारिकांच्या मागण्या योग्य आहेत परंतु सदरची वेळ संप क रण्याची नाही.

Advertisement

तरीही त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.खाजगी कोविड सेंटर चालकांकडून लुट करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या असून लूट करणाऱ्या कोविड सेंटर चालकाविरुद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना सदर विभागाला दिल्या आहेत.

यावेळी तहसीलदार कुंदन हिरे,आरोग्य अधिकारी संजय गायकवाड,राहाता न.पा. मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण,शिर्डीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,डॉ.प्रितम वडगावे,डॉ.मैथिली पितांबरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

याप्रसंगी शिर्डी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर,राहाता नगराध्यक्षा ममता पिपाडा,उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे,कमलाकर कोते,अभय शेळके,

धनंजय गाडेकर,संजय शिंदे,सचिन कोते,मगेश त्रिभुवन ,विजय जगताप ,गणेश सोमवंशी,विजय जगताप,गणेश सोमवंशी, ॲड.अजित महाले,रविंद्र गोंदकर,अशोक गोंदकर,गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li