ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मनपाचे बेकादेशीर लसीकरण कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ?

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या नागरिकांना लस न देता सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावातून खाजगी जागेत मनपाचे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू आहे. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत ? असा सवाल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्तांकडे लसीचा काळाबाजार सुरू आहे का अशी शंका उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांची लसीसाठी ससेहोलपट थांबवा, लसीकरणामध्ये पारदर्शकता आणा,

Advertisement

अशी मागणी काँग्रेसच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला,

क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते आदींच्या सह्या आहेत. काल दिनांक १३ मे २०२१ रोजी मनपाच्या सावेडी लसीकरण केंद्रावर गंभीर प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. नागरिकांमध्ये याविषयी तीव्र संतापाची भावना आहे. याबाबत वर्तमानपत्र,

Advertisement

वृत्त वाहिन्या सोशल मीडियातून घडलेला गंभीर प्रकार लोकांच्या समोर आला आहे. काल सावेडी उपनगरामध्ये लसीकरण केंद्रावर घडलेल्या गैरप्रकाराबाबत काँग्रेसने महापालिकेकडे उपस्थित केलेले प्रश्न पुढील प्रमाणे :

 • १. काल सावेडी मनपा आरोग्य केंद्रा वरून आपल्या कर्मचाऱ्यांनी लस डॉन बॉस्को या ठिकाणी नेल्या, हे खरे आहे का ?
 • २. डॉन बॉस्को हे ठिकाण लस देण्याचे मनपाचे अधिकृत ठिकाण आहे का ?
 • ३. सावेडीच्या मुळ केंद्रावर किती आणि डॉन बॉस्को येथे किती लस नेण्यात आल्या ? संख्या किती ? ही संख्या कोणी आणि कशाच्या आधारे निश्चित केली ? याची मनापा रेकॉर्डला मनपा कार्यालया पासून ते प्रत्यक्ष लस घेतलेल्या नागरिकांपर्यंत सर्व नोंदी करण्यात आल्या आहेत का ?
 • ४. ज्या सर्व सामान्य नागरिकांनी लस मिळावी यासाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केली आहे, त्यांची यादी मनपाचे यापूर्वी जाहीर करतो असे सांगितल्या प्रमाणे, जाहीर करण्यात आली होती का ? आणि जाहीर करण्यात आलेल्या यादीतील नावे असणाऱ्या नागरिकांनाच या केंद्रावरून लस देण्यात आली का ?
 • ५. नोंदणीकृत जाहीर करण्यात आलेली नावे आणि प्रत्यक्ष लसीकरण झालेली नागरिकांची नावांची यादी, आपण आपल्या स्तरावर ही नावे सारखीच आहेत का त्याची पडताळणी केली आहे का ?
 • ६. डॉन बॉस्को येथून आपल्या परिचारिकांना राजकीय दबावातून एका खाजगी ठिकाणी खाजगी वाहनातून नेण्यात आल्याचे खरे आहे का ?
 • ७. लसीकरणाच्या शासकीय वेळेत शासकीय केंद्रावर उपस्थित न राहता खाजगी ठिकाणी आपल्या परिचारिका कशा काय गेल्या ? त्याबाबत मनपाच्या कोणत्या वरिष्ठांनी दबाव आणला होता ? सदर खाजगी ठिकाण हे मनपाचे अधिकृत लसीकरण केंद्र आहे का ? या ठिकाणी कोणाचे लसीकरण करण्यात आले ?
 • ८. आपल्या परिचारिकांना शासकीय मालमत्ता असणाऱ्या लस सदर खासगी जागेत नेण्याबाबत मनपा आयुक्त यांचे आदेश होते का ? असे बेकायदेशीर आदेश देण्याचा मनपा आयुक्त, इतर संबंधित मनपा अधिकाऱ्यांना अधिकार आहे का ?
 • ९. मनपाच्या लसीकरण केंद्रातून लस या बाहेर गेल्याच कशा ? त्या बाहेर नेण्यामागे मनपाचा नेमका हेतू काय ?
 • १०. लस बाहेर नेवून मनपाचे कोणी लसीचा काळाबाजार करीत आहे का ? ११. सदर बाहेर नेलेल्या लस या कोणत्या कर्मचाऱ्यांनी नेल्या ? कोणाच्या सांगण्या वरून नेल्या ? कोणाला दिल्या ? यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का ? यात कोणा कोणाचा सहभाग आहे ? त्यांच्यावर कोणी राजकीय दबाव आणला का ?
 • १२. ही घडलेली घटना होवून एक दिवस उलटला आहे. याबाबत सबंध शहरभर तीव्र संतापाची लाट आहे. वर्तमानपत्र, वृत वाहिन्या, सोशल मीडयाद्वारे हे प्रकरण जनते समोर आले आहे. मात्र अजून मनपा आयुक्तांना याबाबत कोणती ही कल्पना नाही का ? याबाबत आयुक्तांनी काही कारवाई केली आहे का ? कोणते आदेश काढले आहेत का ? मनपा आयुक्त कोणत्या हेतूने या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का ?
 • १३. सदर प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी कोणती कारवाई केली आहे का ? याबाबत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे का ?
 • १४. सदर लसी मनपा आरोग्य केंद्रातून खाजगी जागेत नेणाऱ्यांवर Pandemic Act नुसार तसेच इतर अनुषंगिक कायद्यांनुसार मनपाने काय कारवाई केली आहे ? तशी प्रक्रिया सुरू केली आहे का ? घडलेल्या घटनेचा संबंधितांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत का ?
 • १५ एवढ्या गंभीर प्रकरणात संबंधित दोषी मनपा कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे का ?
 • १६. सदर कर्मचाऱ्यांकडे लसीचा अजून कोणता साठा त्यांनी दडवून ठेवलेला आहे का ? असल्यास तो कोठे ठेवला आहे याचा मनपाने शोध घेतला आहे का ?
 • १७. घडलेले प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून याबाबत मनपा आयुक्त यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी कळविले आहे का ?
 • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
 • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li