काेराेनामुळे पती गमावलेल्या महिलांना मदत करणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करिना कपूरने सोशल मीडियावर एक माहिती शेअर केली आहे. ही माहिती त्या महिलांसाठी आहे, ज्यांच्या पतीचा मृत्यु कोरोनामुळे झाला आहे.

करिना त्यांच्या दु:खात सहभगाी असून तिने सहाुनभूती व्यक्त केली आहे. पोस्टमध्ये त्यांना रोजगार मिळवण्यात मदत मिळू शकते. करिनाने लिहिले, या उपक्रमात कोणीही वॉलेंटियर म्हणून काम करू शकते.

खेड्यापाड्यापर्यंत पाेहोचवू मदत या पोस्टमध्ये लिहिले, पतीला गमावल्याचं त्या महिले व्यतिरिक्त काेणीही समजू शकत नाही.

मात्र त्यांना पुन्हा उभे करण्यास तुम्ही नक्कीच मदत करू शकता. रीम सेनच्या या पोस्टमध्ये कोविड विडोज डॉट इनवर याविषयी माहिती देण्यात आली आहे.

ही वेबसाइट समुपदेशन, देखरेखच्या माध्यमातून महिलांना काम मिळवून देणार आहे. यासाठी सरकार आणि एनजीओची मदत घेतली जाणार आहे.