ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

असा जाईल तुमचा आजचा दिवस ! वाचा राशीभविष्य @28-05-2021

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  मेष:- दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.

वृषभ:– मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागिदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल.

Advertisement

मिथुन:- कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.

कर्क:- आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व पट‍वून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील.

Advertisement

सिंह:- जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील.

कन्या:- जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

Advertisement

तूळ:- तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील.व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या.

वृश्चिक:- जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल.

Advertisement

धनू:- मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.

मकर:- दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

Advertisement

कुंभ:- खेळीमेळीत दिवस जाईल. घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्‍यांना कामात मदत कराल.

मीन:- कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. चटपटीत पदार्थ खाल.

Advertisement

li