ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कसा जाईल आठवड्याचा पहिला दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य !

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- मेष :सामाजिक गोष्टींमध्ये सक्रिय असाल. स्वत:वर आणि इतरांवर विश्वास ठेवाल. डोक्यात नव्या योजना तयार होतील.आर्थिक व्यवहारांबाबत दक्ष राहण्याची गरज.

वृषभ :आज नशिबाची साथ मिळेल. एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक केल्यास यशस्वी होण्याची अधिक संधी. आयुष्यात नवे बदल घडतील. नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील.

Advertisement

मिथुन :आज तुम्ही व्यवहारीपणे वागाल, याचा फायदाही होईल. जोडीदाराशी असलेले मतभेद संपवा. इतरांना समजून घ्या. आई-वडिलांकडून मदत मिळेल.

कर्क : आजचा दिवस धावपळीत जाईल. शारीरिक आणि मानसिक दमछाक होईल. आर्थिक आवक वाढेल. व्यवसायात भविष्यात फायदेशीर ठरणाऱ्या योजना आखाल.

Advertisement

सिंह :नवी गोष्टी शिकायला मिळतील. भागीदारीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.कामात मन लागेल, आर्थिक आवक वाढेल.

कन्या : व्यवसायात नशिबाची साथ लाभेल. आर्थिक आणि रोजगाराच्या स्तरावर चांगल्या बातम्या कानावर पडतील. तुम्ही हाती घेतलेल्या कामात इतरांचे सहकार्य लाभेल

Advertisement

तूळ :एखाद्या गोष्टीविषयी मनात उत्सुकता निर्माण होईल. चांगले बोलून कार्यभाग साधता येईल. निस्वार्थी भावनेने इतरांना मदत कराल.

वृश्चिक :आजच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. नातेसंबंधांच्यादृष्टीने खास असा दिवस. एखादे नाते अधिक मजबूत होईल कौटुंबिक गाठीभेटी होतील.

Advertisement

धनु : तुम्ही आज सहानुभूती आणि लवचिकतेने विचार कराल. मित्राचा सल्ला ऐकल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या मदतीमुळे एखाद्या व्यक्तीची अडचण दूर होईल.

मकर : नात्यामधील गैरसमज दूर करण्यासाठी चांगला दिवस.आजचा दिवस आनंदात जाईल. स्वत:मध्ये काही बदल करण्याचे ठरवाल. पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होईल.

Advertisement

कुंभ :. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग संभवतो.दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल.नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील

मीन :अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता. नव्या लोकांच्या गाठीभेटीतून प्रेरणा मिळेल. दुसऱ्यांचा सल्ल्याचा विचार करा, कामकाजाकडे गांभीर्याने पाहा.

Advertisement

li