ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

उत्कृष्ट ! एका लिटर पेट्रोलमध्ये ‘ही’ बाइक धावेल104 किमी, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- सध्या लोक स्वतःची गाडी असावी या बाबत आग्रही आहेत. कोरोनाच्या काळामध्ये तर याची जास्तच जाणीव भासत आहे.

बाईक घेताना लोक उत्कृष्ट मायलेज असलेल्या बाईक घेण्यास प्राधान्य देतात.आजच्या काळात बर्‍याच कंपन्या उत्कृष्ट मायलेज असलेल्या बाईक देत आहेत.

Advertisement

आपण अगदी कमी किंमतीत उत्तम मायलेज असलेली बाईक खरेदी करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन बाईक्संबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्हाला दमदार मायलेज मिळेल आणि त्यांचा मेंटेनेंसही खूप कमी आहे.

अलीकडेच हिरोने एक उत्तम मायलेज आणि कमी किंमतीची बाईक बाजारात आणली जी खूपच पसंत केली जात आहे.बजाज प्लॅटिना आणि बजाज सीटी 100 बाइक्सचादेखील या यादीमध्ये समावेश असून त्यांची सुरूवात किंमत 49 हजार रुपये आहे.

Advertisement

हे लक्षात ठेवा की येथे नमूद केलेले दर एक्स-शोरूम दिल्ली आहेत आणि त्यांच्या मायलेजची माहिती देखील अहवालाच्या आधारे दिली जात आहे जी ड्रायव्हिंगची स्टाइल आणि रोड कंडिशननुसार बदलू शकते. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया …

Bajaj Platina 110 :- बजाज ऑटोची ही बाईक सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे आणि यात 102cc चे एअर कूल्ड इंजिन आहे जे 7.9 पीएसची पॉवर आणि 8.3Nm एनएम टॉर्क जनरेट करते.

Advertisement

त्याच्या फ्रंट मध्ये टेलिस्कोपिक फॉर्क व मागील बाजूस नायट्रॉक्स शॉक ऑब्जर्वर सस्पेंशन मिळते जे त्याचा राइडिंग एक्सपीरियंस आणखी चांगले करते. याची किंमत 54,669 रुपये आहे आणि ते 80 ते 85 किलोमीटर प्रतिलीटर माइलेज देते.

Hero HF 100 :- हिरो मोटोकॉर्पने नुकतीच ही बाईक बाजारात आणली आहे. ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईकपैकी एक आहे आणि त्याची किंमत 49,400 रुपये आहे.

Advertisement

कंपनीने या बाईकमध्ये 97.2 सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे जे 8.36 पीएस पावर आणि 8.05Nm ची टॉर्क जनरेट करते. हे 70 ते 75 किमीचे मायलेज देते.

Bajaj CT100 :- मायलेजच्या बाबतीत ही बाईक पहिल्या क्रमांकावर असून ती 104 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते.

Advertisement

या बाईकमध्ये बीएस 6 कंप्लेंट 102 सीसी एअर कूल्ड, सिंगल-सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड इंजिन आहे ज्यात 4-स्पीड गिअरबॉक्स 7.5bhp पॉवर आणि 8.34Nm टॉर्क जनरेट करतो. याची किंमत 49,152 रुपये आहे.

Advertisement
li