चांगल्या पावसाचे संकेत, कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- यंदाच्या वर्षी राहुरी तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. या वर्षी पावसाचे चांगले संकेत असल्याने कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील १७ गावे खरिपाची मानली जातात. खरिपाचे १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्र असले तरी तालुक्यात अनेक ठिकाणी खरीप पिके घेतली जातात. यात प्रामुख्याने कापूस, भुईमूग, मका या पिकांचा समावेश आहे.

कापूस, भुईमूग, मका या पिकांचा समावेश आहे. सध्या राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. या वर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार एकूण २० हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्यांचे उद्दिष्ट असून त्यात कापूस ११ हजार हेक्टर, बाजरी ९ हजार हेक्टरवर,

सोयाबीन ४ हजार हेक्टर, मका ३ हजार ५००, मूग १ हजार ६०० हेक्टर, भुईमूग ५५० हेक्टर तर तुरीचे २५० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होण्याची शक्यता आहे. कांदा, ऊस व चारा पिकांचाही मुबलक प्रमाणावर पेरा झालेला आहे.

मागील वर्षी २६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्यांचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून असताना चांगल्या पावसामुळे राहुरी तालुक्यात २९ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर अर्थात ११५ टक्के पेरण्या झाल्या होत्या.

या वर्षीदेखील चांगल्या पा वसाचे संकेत आहेत. हवामान विभागानेही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राहुरी तालुका कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तयारी केली असून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.