शेतकऱ्यांना मिळणार तज्ज्ञांचा ऑनलाईन सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर यांच्यावतीने शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन शेती विषयक चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती सभापती गायकवाड यांनी दिली.

तसेच हे चर्चासत्र झूमअ‍ॅपवर होणार आहेत व त्याच्या लिंक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याची माहिती सभापती गायकवाड, उपसभापती विलास झावरे व सर्व संचालक मंडळ यांनी दिली.

दरम्यान शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची सुरुवात येत्या 10 जूनपासून सकाळी 10 वाजता होणार आहे.

प्रत्येक महिन्याला 2 वेळा वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. पहिल्या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये कांदा बीजोत्पादन, रोपवाटिका, उत्पादन, तंत्रज्ञान व साठवणूक या विषयावर कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे हे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच या चर्चासत्रामध्ये कांदा, डाळी, कडधान्य, डाळिंब, खरीप तयारी, पशुवैद्यकीय, कृषी विषयक छोटे व्यवसाय आणि प्रकल्प, विकास सोसायट्यांचे नवीन कायदे- नियम, कर्ज माफी, शेती विषयक शासकीय योजना, पीक विमा, आधुनिक शेती व यांसारखे इतर विषय घेऊन शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार आहे.

तसेच या ऑनलाईन उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी मेडिटेशन यावर देखील चर्चासत्र घेणार आहेत. या चर्चासत्रांमध्ये विविध कृषीतज्ञ व प्रगतिशील शेतकरी यांचा सहभाग असणार आहे. चर्चासत्रातील विषयांशी निगडित शेतकर्‍यांना त्यांचे प्रश्‍न व शंका यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.