ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये पहिल्या दिवशी कांद्याच्या ३१ हजार गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जवळपास 2 महिन्यांच्या खंडानंतर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट सोमवारपासून विविध अटी व मर्यादांमध्ये सुरू झाले आहे.

दरम्यान घोडेगाव कांदा मार्केटमध्ये पहिल्या दिवशी सोमवारी कांद्याच्या ३१ हजार ६२९ गोण्यांची आवक झाली. काल मंगळवारी या कांद्याचे लिलाव झाले.

Advertisement

यामध्ये कांद्याला तब्बल २१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव निघाले. एक नंबरच्या कांद्याला १६०० ते १८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

दोन नंबरला १४०० ते १६०० रुपये, तर तीन नंबरला ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गोल्टी कांद्याला ९०० ते १२०० रुपये पर्यंत भाव मिळाला.

Advertisement

तीन ते चार वाकलांना २१०० रुपयांचा भाव मिळाला. सोमवारी कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी या कांद्याचा नव्या नियमानुसार लिलाव करण्यात आला

Advertisement
li