ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

लॉकडाऊन शिथील झाला तरी नियमांचे पालन करा…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- लॉकडाऊन शिथील झाला असला, तरी व्यापाऱ्यांसह नेवासकरांनी सुरक्षेच्या दृष्टीने शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी केले आहे.याबाबत पत्रकात गर्कळ यांनी म्हटले, की लॉकडाऊनच्या कालावधीत नियम तोडणाऱ्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केली.

नेवासा शहरातील व्यावसायिकांनी जनता कफ्र्युसह लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. वेळेनुसार दुकानेही बंद केली. शासन नियमांचे पालनही केले. आता लॉकडाऊन शिथील झाले असले, तरी नागरिकांनी कोरोनाचे भान विसरू नये.

Advertisement

बाहेर पडताना तोंडावर मास्क परिधान करूनच बाहेर पडावे. स्व:तच्या सुरक्षेतेसाठी सामाजिक अंतराचे पालन करावे, व्यापाऱ्यांनीही ग्राहकांना नियम घालून देऊन सुरक्षित अंतर ठेवून व्यवसाय कसा करता येईल,

आपल्यापासून कोरोनाला कसे लांब ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करावा, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन नेवासकर नागरिकांना केले आहे.

Advertisement

तिसऱ्या लाटेबाबत आमची यंत्रणा सतर्क असून यासाठी समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात १०० बेडची व्यवस्था होण्यासाठी प्रस्ताव पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
li