ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेसह तिघांंविराधाेत दोषारोपपत्र दाखल : सानप

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ‘त्या’ महिलेसह तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ही माहिती दिली. आरोपींमध्ये संबंधित महिला, अमोल मोरे (रा. नगर) व बापू सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) यांचा समावेश आहे.

Advertisement

तालुक्यातील जखणगाव येथे हे प्रकरण घडले होते. संबंधित महिलेने एका व्यापाऱ्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी पाच लाख रुपये दिल्यानंतर संबंधित महिला व नगर येथे राहणारा अमोल मोरे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी संबंधित महिला व अमोल मोरे यांना तत्काळ अटक करून त्यांच्या ताब्यातून २ मोबाइल यासह रोकड हस्तगत केलेली होती. या घटनेच्या तपासामध्ये नगर तालुक्यातील बापू सोनवणे या व्यक्तीचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याचे

Advertisement

तपासात उघड झाल्यानंतर काही दिवसानंतर पोलिसांनी बापू सोनवणेला अटक केली. फिर्यादीची सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या तसेच ८४ हजार तीनशे रुपये रोख असा एकूण ५ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतलेला होता.

या घटनेचा तपास सुरू असतानाच नगर तालुका पोलिस ठाण्यात याच प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला. एका अधिकाऱ्याला ३ कोटींची खंडणी याच व्यक्तींनी मागितली होती.

Advertisement

हे त्यावेळी निष्पन्न झाले होते. तिन्ही आरोपींच्या विरोधात न्यायालयात ८२ पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोप पत्रामध्ये तपासाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत.

त्यांनी खंडणी कशा पद्धतीने मागितली, तीन कोटी च्या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे, तसेच त्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील सादर करण्यात आलेले आहे.

Advertisement

li