अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूंचे आकडे लपविले ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या मनात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काेराेना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २२४ ने वाढली आहे. अचानक मृतांची संख्या वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि आराेग्य यंत्रणेने यापूर्वी मृत्यूच्या नाेंदी लपविल्या का, असा संशय व्यक्त केला जात आहे.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गेल्या 24 तासांमधील काेराेना संसर्गाची आकडेवारी आज सायंकाळी जाहीर केली.

ही आकडेवारी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांपर्यंत पाेहाेचविण्यात आली. आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 3 हजार 795 नोंदविण्यात आली आहे.

हे प्रमाण काल 3 हजार 571 एवढे होते. अर्थात आज मृतांच्या नोंदीत 224 ने वाढ झाली. एकाच दिवशी एवढ्या माेठ्या प्रमाणात मृत्यूची नाेंद झाल्याने याबाबत शंका उपस्थित झाली आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडे लपविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. मृत्यूचे आकडे लपविले गेले की काय, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. या प्रकाराची चाैकशी व्हावी, अशी मागणी हाेत आहे.