ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

त्या व्हायरल क्लिपमुळे पोलिसांत खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- पोलीस ठाण्यातील आपल्या सहकाऱ्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवून त्याच्यावर कुरघोडी करण्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

या क्लिपची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राजूर पोलिसांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी राजूर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस हवालदाराने विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच एक पोलीस आपल्या सहकारी हेड कॉन्स्टेबलला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

त्यामुळे या दोन्ही घटनांची सखोल चौकशी झाली तरच सत्य समोर येईल व यामागील गौडबंगाल काय आहे हे सर्वसामान्यांनाही समजेल.दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता क्लिपची खातरजमा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

li