विमा कंपन्यांकडून शेतक‍ऱ्यांची निराशा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- नैसर्गिक आपत्तीमध्ये होणा‍ऱ्या नुकसानीला काही अंशी का होईना संरक्षण मिळावे म्हणून अनेक शेतक‍ऱ्यांनी डाळिंब,

सोयाबीन, मका अशा विविध पिकांचा हवामान आधारित विमा उतरविला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु, झालेल्या नुकसानापासून दिलासा मिळण्यासाठी विमा कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही.

डाळिंब उत्पादक आजही विम्याच्या प्रतिक्षेत आहेत. विमा कंपन्यांना संपर्क केला असता तुमचे नुकसान पावसाने झाले. गारपिटीने झालेले नाही, त्यामुळे विमा संरक्षणाची रक्कम देता येणार नाही,असे सांगून डाळिंब उत्पादकांच्या पदरी निराशाच पडली.

त्यामुळे कोणत्याही पिकाचा विमा काढावा की नाही याबाबत शेतक‍ऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील यावर नेटकऱ्यांच्या माध्यमातून टीका होताना दिसत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे,अशी अपेक्षा येथील शेतकरी वर्ग बोलून दाखवत आहे.