ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘त्या’ खाजगी कोविड सेंटर चे शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये रूपांतर होणार असल्याने उपोषण स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे इमारती मधील खाजगी कोविड सेंटर चे शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याचे नगरपरिषद आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन मान्य केलेने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे गेट समोर दि. १० जून रोजी करणार असलेले

आमरण उपोषण तूर्त स्थगित केले असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे. देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेले

Advertisement

खाजगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देणेसाठी नगरपालिकेने स्वतः ते कोविड सेंटर चालवावे अन्यथा नगरपालिकेच्या गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब यांना निवेदन दिले होते.

इमारत नगरपालिकेची, पाणी नगरपालिकेचे, वीज नगरपालिकेची, सफाई कामगार नगरपालिकेचे, या कोविड सेंटर मध्ये असलेले बेड विवेकानंद नर्सिंग होम यांचे… मग कोविड सेंटरच खाजगी का? असा देवळाली प्रवराच्या नागरिकांना प्रश्न पडला होता.

Advertisement

नगरपालिकेच्या मोफत मालमत्तेमध्ये खाजगी कोविड सेंटर चालवून रुग्णाला भरमसाठ बिलाची आकारणी कशी काय करू शकता असा सवाल आप्पासाहेब ढुस यांनी विचारून तात्काळ हे कोविड सेंटर शासकीय करा नाहीतर चले जाव आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला होता.

तसेच चार दिवसाचे चाळीस हजार रुपये बिल भरायला पैसे नसलेणे या खाजगी कोविड सेंटरमध्ये अडकून पडलेल्या देवळाली प्रवरा येथीलच रुग्णाला सोडवायला आंदोलन करायची वेळ आल्याने ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन दिले होते.

Advertisement

आमरण उपोषण च्या निवेदनात ढुस यांनी म्हंटले होते की, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटरची माहिती मिळणे कामी आम्ही दि. १३ मे रोजी नगरपालिकेला पत्र देऊन विनंती केली होती.

तथापि नगरपालिकेने आम्हास माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारती मध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची लूटमार होत असलेबद्दल आमची खात्री झाली आहे.

Advertisement

तसेच कोरोनाची तिसरी लाट येणेपूर्वी या खाजगी कोविड सेंटरमध्ये आणखी काही बेड वाढवून त्याचे शासकीय मोफत कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे किंवा नगरपालिकेने ते स्वतः चालवावे या बाबत आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती केली आहे.

त्यावरही नगरपालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणून आपणास विनंती की, (१) या खाजगी कोविड सेंटरची नगरपालिकेकडून माहिती मिळावी, (२) या कोविड सेंटरची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, (३) या कोविड सेंटर मध्ये आणखी काही बेड वाढवून ते शासकीय कोविड सेंटर करावे,

Advertisement

किंवा नगरपरिषदेने ते कोविड सेंटर स्वतः चालवीनेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी व येथील नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून कोरोनाची तिसरी लाट येनेपूर्वी देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना आश्वस्थ करावे.

आदी मागण्यासाठी गुरुवार दि. १० जून २०२१ रोजी सकाळी १०.०० वा. पासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गेट समोर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते.

Advertisement

त्या उपोषणाच्या निवेदनाचे अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर आणि मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचा संदर्भ देऊन देवळाली प्रवरा येथील हे खाजगी कोविड सेंटर दि. ०१ जून पासून बंद केले असलेने उपोषणा पासून परावृत्त होणे बाबत राहुरीच्या तालुका आरोग्य अधिकारी यांनी पत्राने कळविले आहे.

तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेने आम्ही मागितलेली माहिती काही प्रमाणात उपलब्ध करून देऊन दि. ३१/०५/२०२१ रोजीचे विशेष सर्वसाधारण सभेत या खाजगी कोविड सेंटर चे शासकीय कोविड सेंटर मध्ये रूपांतर करून रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध होणेची मा. जिल्हाधिकारी साहेब

Advertisement

अहमदनगर यांना प्रस्ताव पाठविला असल्याचे व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी लवकरच हे मोफत कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी साहेब यांनी दिले आहे. त्यामुळे या कोविड सेंटर मध्ये किती रुग्ण किती दिवस भरती होते

त्यांची गाव निहाय यादी आणि या कोविड सेंटरची चौकशी करून त्यातील कोट्यवधी रुपयांचा झालेला गैरकारभार जनतेसमोर उघड करावा या मागण्या कायम ठेवून आम्ही दि. १० जून रोजी नगरपालिकेचे गेट समोर करणार असणारे आमरण उपोषण तूर्त स्थगित करीत आहोत

Advertisement

असे आप्पासाहेब ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. सर्वांच्या सहकार्याने या आमरण उपोषणाच्या आंदोलनाला यश आले बद्दल समाधान व्यक्त करून ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब, पांत साहेब, राहुरी चे तहसीलदार साहेब,

तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, आदींनी हे कोविड सेंटर शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये रूपांतरित करण्यास सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण

Advertisement

यांनी राहुरीचे तहसीलदार यांना पत्र देऊन उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला, त्यांचे सोबत अनेक व्यक्ती व संघटना उपोषणाला बसणार होते. त्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह उपोषणाला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे ढुस यांनी आभार व्यक्त केले.

Advertisement
li